Friday, April 26, 2024

/

माजी जि. पं. सदस्य मेटी यांची गोळ्या घालून हत्या

 belgaum

जमिनीच्या वादातून चुलत भावाने आपल्या रिवॉल्वरने बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य चिंतामणी रामाप्पा मिटी यांची गोळ्या घालून निघृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी मुडलगी तालुक्यातील रामापुर गावामध्ये घडली.

55 वर्षीय मेटी यांच्या छातीत दोन गोळ्या डागण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मेटी यांचा चुलत भाऊ गोपाळ चिंतामणी याने आपल्या लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून मेटी यांच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेतील मेटी यांना तातडीने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जमिनीच्या वादातून खुनाची ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.