Friday, April 26, 2024

/

कुद्रेमानी ग्रामस्थांना सीमा पार करण्यास परवानगी द्या-सरस्वती पाटील

 belgaum

कुद्रेमानी गावाला जाताना महाराष्ट्राच्या हद्दीतून जावे लागते . कुद्रेमानी गावाला सभोवताली संपूर्ण महाराष्ट्राची हद आहे . या गावातून बेळगावकडे येण्यासाठी शिनोळी मार्गच यावे लागते . मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस तर कर्नाटकच्या हद्दीत कर्नाटक पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत . त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे .

आंतरराज्य सीमा बंदीमुळे धड कर्नाटकातही नाही आणि महाराष्ट्रातही नाही अशा कोंडीत सापडलेल्या कुद्रेमनी या गावातील लोकांचे अत्यंत हाल होत असून त्यांना बेळगाव शहराच्या दिशेने हद्द पार करण्यास परवानगी परवानगी दिली जावी, अशी मागणी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ एस. बी. बोमनहळ्ळी यांच्याकडे केली आहे.

बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी हे गाव चंद्रगडच्या दिशेने कर्नाटक – महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर आहे. या गावाला लागूनच महाराष्ट्र व कर्नाटकची हद्द सुरू होते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव प्रशासनातर्फे कर्नाटक सीमेवर बाची गावानजीक चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राकडून शिनोळी येथे चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. या दोन चेक पोस्ट मध्ये सुमारे दीड-दोन किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरादरम्यान कुद्रेमनी गावाचा विस्तार पसरलेला आहे त्यामुळे लॉक डाऊन, सील डाऊन झाल्यापासून कुद्रेमनीकरांना धड महाराष्ट्रातही प्रवेश दिला जात नाही आणि कर्नाटकातही. यामुळे या गावातील नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे.

 belgaum
Sarasvti patil
Sarasvti patil disscussion on kudreamni issue with dc bgm

कारण सीमा बंदीच्या आदेशामुळे येथील नागरिकांना कर्नाटकातही आणि महाराष्ट्रातही प्रवेश दिला जात नाही. कुद्रेमनी येथील नागरिकांचे आप्तस्वकीय बेळगाव तालुक्यात विविध ठिकाणी वास्तव्यास आहेत. सीमा बंदीमुळे हे आप्तस्वकीय एकमेकापासून तुटले असून कुद्रेमनी गावातील आजारी व्यक्तींचे तर अतिशय हाल होत आहेत.

तेंव्हा या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन कुद्रेमनी येथील नागरिकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल का निर्माण करून द्यावी अशी मागणी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना जिल्हाधिकार्‍यांची भेट घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुद्रेमनी गावची समस्या विषद केली. जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे सरस्वती पाटील यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.