वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करत आहे. मात्र हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संबंधित व्यक्ती वाटेल तसे वागतांना दिसून येत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये परराज्यातून व इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र ही व्यक्ती बाहेर फिरताना दिसून येत आहेत.
तालुक्यातील अनेक शाळा संस्था भवन यासह इतर खाजगी संस्थांमध्ये क्वॉरंटाइन व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. मात्र संबंधित व्यक्ती बाहेर फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत संबंधितांना पोलिसांनी खडक इशारा देऊन संबंधित खोलीतच ठेवावे अशी मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कडोली सह इतर परिसरात अशी व्यक्ती बाहेर फिरताना दिसून येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने आणि संबंधित समितीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यात दोनशेहून अधिक जणांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांची देखभाल करण्यासाठी ग्रामपंचायत तत्पर नसल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी कोणत्याही व्यक्ती बाहेर खेळत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिक समस्येत असल्याचे जाणवत आहे. संबंधित व्यक्तींना त्यांच्या जागीच राहण्याचा सल्ला देण्याची गरज व्यक्त होत असताना अनेक जण बाहेर फिरून इतरांचे आरोग्यही धोक्यात आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना खोलीत राहण्याचा सल्ला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.