Monday, January 27, 2025

/

औषध दुकानदारांची पोलिसांकडून अडवणूक : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

 belgaum

औषध विक्री ही जीवनावश्यक सेवेमध्ये अंतर्भूत असतानाही शहरातील औषध दुकानदारांची अडवणूक करून पोलिसांकडून त्यांना त्रास दिला जात असल्याचे प्रकार घडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना योग्य समज देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

गेल्या कांही दिवसांपासून लॉक डाऊनच्या काळात काही जीवनावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये औषध दुकानांचाही समावेश आहे. औषध दुकाने सुरू करण्यासाठी पोलीस खात्याकडून शहरातील नोंदणीकृत औषध दुकानदारांना विशेष पास देण्यात आले आहेत. तथापि गेल्या कांही दिवसापासून शहरात बऱ्याच ठिकाणी बंदोबस्तास असलेले पोलीस औषध दुकानदारांना अडवून त्यांच्याकडील पास चालत नसल्याचे सांगत आहेत. गोवावेस येथील विघ्नेश्वर मेडिकल्स या औषध दुकान चालकांचा पास तर पोलिसांनी चक्क फोडून टाकल्याचा प्रकार घडला आहे.

चन्नम्मानगर येथे राहणाऱ्या एका औषध दुकानदाराचे गोवावेस येथे विघ्नेश्वर मेडिकल्स हे औषध दुकान आहे. सदर दुकानदार आपल्या घरी जात असताना गोवावेस येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्याला अडविले. त्यावेळी त्या दुकानदाराने आपल्याकडील तपास पोलिसांना दाखविला. तेंव्हा तो पास चालत नसल्याचे सांगून पोलिसांनी त्याच्याशी हुज्जत तर घातलीच शिवाय त्या दुकानदाराच्या तोंडावरच त्याचा पास फाडून फेकून दिला. या पद्धतीने औषध दुकानदारांची शहरात ठीक ठिकाणी अडवणूक करून पोलिसांकडून त्यांना त्रास दिला जात आहे.

 belgaum

सदर प्रकाराची बेळगाव जिल्हा औषध व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बी. बी. सदलगे यांनी “बेळगाव लाईव्ह” ला माहिती दिली. तसेच हा प्रकार जर असाच चालू राहिला तर आम्ही आमची दुकाने उघडायची की नाहीत, असा सवालही केला. पोलीस आयुक्तांनी कामाला देण्यात आलेले पास हे लॉक डाऊन संपेपर्यंत चालणार असल्याचे सांगितले आहे. असे असताना बंदोबस्तास असलेल्या पोलिसांकडून त्यांच्याच खात्याने दिलेले पास अवैध ठरवले जात आहेत. तेंव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याकडे त्वरित लक्ष देऊन शहरात बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना योग्य समज देऊन त्यांनी औषध दुकानदारांची अडवणूक करण्याचा जो प्रकार सुरू केला आहे त्याला आळा घालावा, अशी मागणी देखील
त्याचप्रमाणे जिल्हा औषध व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बी. बी. सदलगे यांनी केली आहे.

दरम्यान, लॉक डाऊनचा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. तेंव्हा जनतेने बेळगाव शहर पोलिसांना आत्तापर्यंत असे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे. सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. थोडक्यात शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.