गेल्या चाळीस दिवसापासून बंद असलेली मद्य दुकाने सोमवारपासून सुरू होणार आहेत.सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत मद्य विक्री केली जाणार आहे.
सोमवारी दुकाने सुरू होणार असली तरी तयारीला आजपासून प्रारंभ झाला आहे.एका व्यक्तीला 2.3लिटर मद्य खरेदी करता येणार आहे.त्यामध्ये रम,व्हिस्की,ब्रॅंडी, व्होडका आदींचा समावेश आहे.तसेच एक व्यक्ती अठरा लिटर बिअर खरेदी करू शकणार आहे.
जिल्ह्यात 270 मद्य दुकाने असून त्यापैकी 60 दुकाने एम आय एस एल ची आहेत.100 दुकाने बेळगाव शहरात आहेत.जिल्ह्यात मद्याचा स्टोक पुरेसा आहे.अशी माहिती अबकारी उपायुक्त बसवराज यांनी दिली आहे.
सोमवारी पासून बेळगावातील तळीरामांचे घसे पुन्हा तब्बल एक महिना दहा दिवसांनी ओले होणार आहेत त्यामुळे बेळगाव शहर परिसरातील शॉप मदिरालाय सुरू करण्याची तयारी झाली आहे प्रत्येक वाईन शॉप समोर सोशल डिस्टन्सच मार्किंग करणे अश्या तयारीत वाईन शॉप मालक लागले आहेत.