Friday, December 20, 2024

/

अखेर मध्यवर्ती बसस्थानक गजबजू लागले

 belgaum

कोरोनाची महामारी रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली. यामधील महत्त्वाचा म्हणजे बस सुरू करण्याचा हा निर्णय आहे. तब्बल 55 दिवसानंतर बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात बसेस धावत आहेत. अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या राज्यांतर्गत प्रवाशांना सोयीचे ठरत ठरत आहे. प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत असतानाच परिवहन महामंडळाच्या आर्थिक खजिन्याची भर टाकण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बेळगाव शहराच्या प्रवेश द्वारावरच प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग आणि स्यांनीटायझरद्वारे हात स्वच्छ करूनच बस मध्ये बसण्यासाठी मुभा देण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरांतर्गत धावणार्‍या बस सेवेत फक्त 25 प्रवासी बसतील आणि परत जिल्ह्यात जाण्यासाठी 30 प्रवाशांना मुभा देण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत या बसेस धावणार आहेत. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून 252 बसेस धावणार आहेत. सध्या मध्यवर्ती बस स्थानक सुरू झाल्याने अनेकांतून समाधान होत असले तरी म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही.

Ksrtc bus
Ksrtc bus

दोन महिन्यांत  अंदाजे 50 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय नियंत्रण अधिकारी महादेवप्पा मुंजी यांनी दिली.मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासी अधिक प्रमाणात होते. चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन सुरू झाले आहे. यामध्ये राज्य सरकारने काही शिथिलता आणली आहे. या सर्व यंत्रणेत महत्त्वाचा टप्पा म्हणून बस सेवेकडे पाहिले जात होते. ती सेवा आता सुरु करण्यात आल्याने अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परजिल्ह्यात अडकलेल्या अनेक प्रवासी समाधान व्यक्त करण्यात येत असली तरी परिवहन महामंडळाने योग्य ती खबरदारी घेऊन अनेकांना सुरक्षित अंतर ठेवूनच प्रवास करण्याचा सल्लाही देत आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाने एक बैठक घेऊन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारपासून बससेवा सुरू झाल्याने अनेक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांनी मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच प्रवास करावा असे आव्हानही कर्नाटक परिवहन महामंडळाने केले आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही गर्दी किंवा दंगा न करता प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी सज्ज रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.