Monday, January 13, 2025

/

जिव्हाव्रण (तोंड येणे)-वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

जिभेवरील बारीक तंतू नष्ट होऊन जीभ लालभडक, चकचकीत होते, त्याला जिव्हाव्रण असे म्हणतात. बोलीभाषेत तोंड येणे असे नावं रूढ आहे. लहान मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांना हा विकार होऊ शकतो.
जिव्हाव्रण होण्याचे कारणे
1. नियासीन, रिबोफ्लेविन (अर्थात बी कॉम्प्लेक्स) ही जीवनसत्वं तसेच ई जीवनसत्व रोजच्या आहारात कमी पडल्यास तोंड येते.
2. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी एकदम कमी झाल्यामुळे तोंड येऊ शकते. अतिसार (शौचाला पातळ होणे) किंवा वारंवार उलट्या होणे, अति दगदग इ. मुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस वाढतो व तोंड यायला सुरूवात होते.
3. सोरियासिस या त्वचाविकारात जिव्हाव्रण येऊ शकतात.
4. सुपारी, तंबाखू व चहा यांच्या अतिसेवनाने तोंड येऊ शकते.
5. मधूमेह (डायबिटीस) यामुळेदेखील जिव्हाव्रण येतात.
6. काही विशिष्ट बुरशी (कँडीडियासीस) मुळे सुध्दा जीभेवर पांढरे चट्टे येतात.
7. पंडूरोगामध्ये (अ‍ॅनिमिया) तोंड येणे हे प्रमुख लक्षण असू शकते.
कित्येकदा तोंडातील अंतःत्वचेवर लाल चट्टे व त्याच्या मध्यावर पिवळा ठिपका असे व्रण दिसून येतात. या प्रकाराला अ‍ॅप्थस अल्सर म्हणतात. आहारात बी कॉम्प्लेक्सचे घटक वाढवल्यास अथवा गोळ्या घेतल्यास हा विकार आटोक्यात येतो. परंतु रूग्णाला तंबाखू किंवा गुटखा खायची सवय असल्यास या विकाराची परिणती सबम्युकस फायब्रोसिस अर्थात कॅन्सरच्या सुरूवातीच्या टप्यात होते. पांढरा चट्टा पडून त्यावरील अंतःत्वचेचा पापुद्रा नाहिसा होतो. या तक्रारीकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर कॅन्सरची सुरूवात होऊ शकते.
उपचार- निसर्गोपचार- आहारामध्ये लालभाजी, पालक, बीटरूट, खजूर तसेच गूळ, हातसडीचे तांदूळ यांचा वापर वाढवावा. ’सबजा’ नावाच्या वनस्पतीचे बीज रात्री भिजत घालून सकाळी पाण्याबरोबर अथवा दुधाबरोबर घेतल्याने शरीरातील ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. थोडक्यात शरीरातील उष्णता कमी होते.
होमिओपॅथी- होमिओपॅथीमध्ये प्रत्येक लक्षणामागे एक औषध आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लहान मुलांमध्ये दुधाच्या बाटलीच्या निलमुळे तोंउ येते त्यावर एक होमिओपॅथिक औषधं आहे.
तंबाखू, पान अथवा गुटखा खाणार्‍याच्या जिभेवर अथवा गालावर सबम्युकस फायब्रोसीसचा व्रण दिसत असल्यास त्यावर कॅप्सीकम नावाचे औषध हमखास लागू पडते. जीभेवर दाताचे व्रण पडून जीभ लालभडक दिसत असल्यास व रूग्णाला सतत तहान लागत असल्यास मर्क सॉल हे औषध देता येते. जिभेचा फक्त शेंडा लाल होत असल्यास एक ठराविक औषध आहे. जिभेवर कायम फोड येणे, अपचन, अ‍ॅसिडीटी, अशक्तपणा असल्यास कार्बनग्रुपमधील एक औषध उपयुक्त असते.
जिभेच्या मुळावर पांढरे फोड व दुखरे व्रण पडले असल्यास ’थूजा’ हे औषध देता येते. जिभेच्या मुळावर वाळलेल्या मातीसारखा थर आणि चव आंबट किंवा साबणासारखी वाटत असल्यास ’कॅल्केरिया सल्फ’ या औषधाने आराम मिळतो. खूप लाळ गणे, तोंडाला घाण वास येत असल्यास मर्कसॉल हे औषध घेतल्याने त्रास पूर्ण बंद होतो. परंतु फक्त लक्षणांवरून अशी उपाययोजना केल्यास ती तात्पुरती तसेच घातक ठरू शकते. फक्त लक्षणेच विचारात न घेता रूग्णाची व्यक्तीवैशिष्ट्ये तक्रारींचे स्वरूप व तीव्रता, रूग्णाचा पूर्वेतिहास याकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना केल्यास रूग्ण बरा होतात. अन्यथा फक्त एखादेच लक्षण बरे होऊन काही नवीनच त्रास सुरू होऊ शकतो. याकरिता कोणतेही होमिओपॅथिक उपचार घेताना तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असते.

#DrSonaliSarnobat
9916106896
9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.