बेळगावात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेकांना याची धास्ती लागून राहिले आहे. मात्र दिलासादायक बाब उघडकीस आल्या आहेत. शनिवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असला तरी पाच जण निगेटिव्ह आढळल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.
एकीकडे बेळगाव जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे निगेटिव रुग्णांचा आकडा देखील वाढला आहे. शनिवारी पुन्हा पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. त्यामुळे ही बेळगावकरांसाठी एक दिलासादायक घटना असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव रायबाग आणि संकेश्वर वगळता अन्य तालुक्यातील व्यवहार सुरू होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. याच दृष्टिकोनातून एक सुखद बातमी ही मिळाली आहे. बेळगाव येथील पाच जण निगेटिव आढळल्याने आता हा आकडा वाढण्याची शक्यता ही आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. चार मे पासून काही तालुक्यातील व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. आता पुन्हा पाच निगेटिव रुग्ण आढळल्याने हे व्यवहार सुरू होण्यात अडचण नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
पी-282 पी-283 पी-285 पी-286 पी-288 यांना पी-224 कडून संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. आता या साऱ्यांची सुटका झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 15 वरून पोचली आहे. या मधील एका 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. हिरे बागेवाडी कार्यक्षेत्रातील हे पाच जण असल्याचे सांगण्यात येत आहे. आता आणखी काही जणांचा अहवाल निगेटिव येण्याची शक्यता आरोग्य खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे लवकरच कोरोना मुक्त बेळगाव जिल्हा होणार असल्याचेही सांगण्यात आले.