Sunday, January 12, 2025

/

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

 belgaum

तिवोलीवाडा (ता. खानापूर) येथे जंगली गव्याच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार झाला आहे.जंगली गव्याच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार झाल्याची घटना तिवोलीवाडा (ता. खानापूर) येथे आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. जुवाव पेद्रु मस्करेन (वय ५५) रा. तिवोलीवाडा असे त्याचे नाव आहे.

खानापूर-तिवोलीवाडा रस्त्यापासून अर्धा किलो मीटर आत असलेल्या शिवारात जुवाव गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलातून आलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. शिंगावर घेऊन उचलून त्यांना एका झाडावर आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रोज दहा वाजेपर्यंत भाकरी खाण्यासाठी जुवाव शेतातल्या घरी परत येत होते. मात्र उशीर झाला तरी ते घरी आले नसल्याने त्यांच्या पत्नीने जंगलाकडे धाव घेतली. त्याठिकाणी एका झाडाखाली जुवाव निपचित पडल्याचे दिसून आले. बाजूलाच गव्यांचा कळपही ठाण मांडून बसला होता. रक्तबंबाळ झालेल्या पतीला पाहून पत्नीने आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलाविले. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. खानापूर पोलिस घटनेचा पंचनामा करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.