Tuesday, January 7, 2025

/

बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुके खुले करा- शेट्टर

 belgaum

मागील दीड महिन्यांपासून बेळगाव शहरासह संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असले तरी आता जिल्हा पालकमंत्र्यांनी एक दिलासादायक खुलासा केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 9 तालुके दिनांक 4 नंतर सुरू करा अश्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एक ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतीच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत यांनी राज्य सरकारकडे चर्चा केली असून तातडीने या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाहीत. त्या तालुक्यातील व्यवहार सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

बेळगाव जिल्ह्यात एकूण 73 पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रायबाग हुक्केरी आणि बेळगाव तालुक्यातील हे रुग्ण आहेत. या रुग्णांमधील काही जण बरे झाले आहेत. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत त्या तालुक्यांना रेड झोन’मध्ये टाकण्यात आले आहे. मात्र आता उर्वरित तालुक्यातील व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आणखीन दोन दिवसानंतर बेळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यामधील व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने पालकमंत्र्यांनी पावले उचलली आहेत. मात्र ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणी सर्व व्यवहार बंद ठेवून लॉक डाऊन कायम ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जगदीश शेट्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुके सुरळीत करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बेळगाव रायबाग आणि संकेश्वर वगळता अन्य तालुक्यातील व्यवहार सुरू होणार आहेत.पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्या सूचनेनुसार राज्य आणि केंद्राच्या मार्गदर्शक तत्वावर त् 4 मे पासून 3 तालुके वगळता बेळगाव बऱ्यापैकी सुरू असणार आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Why r there no supplies of essential Commodity in Belgavi Bapat Galli my mother is a diabetic and she stays alone at home n she has none to get her supplies from market at the designated times she hardly can walk n get the needed food items n vegetables, so it’s my kind request please make arrangements for my mother. Bapat galli Lokhande Complex 2nd floor is her address we children stay in different cities so please help seniors

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.