बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील खत विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांना कृषी खात्याने कारणे दाखवा नोटीस ( शो कॉज ) बजावली आहे . दर्जाहिन खताची विक्री करणे , कृषी खात्यांच्या निर्देषांचे पालन न करणे , कॅश बुक , स्टॉक , बुक न लिहिणे आदी कारणावरुन दुकानदारांना कृषी अधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी अचानक दुकांनाना भेट देऊन कारवाई करण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील खतविक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये देखील खळबळ उडाली आहे . गेल्या वर्षी जिल्हाभर खते , बियाणे जादा दराने विक्री करून चांगलाच गोंधळ उडाला होता . हा प्रकार टाळण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी विशेष पथकाची स्थापना केली आणि असे गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर असल्याचे वातावरण निर्माण केले आहे .
कृषी खात्याच्या नियमांचे पालन करत चांगल्या प्रतिची बियाणे आणि खतपुरवठा करण्यात यावा . अन्यथा तशा दुकानदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा कृषी खात्याने देण्यात आला आहे . पेरणी काळात शेतकऱ्यांना बियाने आणि खाताची कमतरता भासू नये , यासाठी साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे उपलब्ध व्हावीत , त्यांची फसगत होऊ नये , यासाठी कृषी खात्याचे पथक सध्या दुकानांना भेटी देउन पाहणी करीत आहेत . कृषि विभागाकडे प्रामुख्याने शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या निविष्ठा पुरवठयाचे काम आहे.त्या मध्ये खते , बियाणे , किटकनाशके , अवजारे यांचा समावेश आहे . जिल्हयामध्ये आवश्यक असणारा खताचा साठा गरजे इतके बियाणे
ही निरनिराळया विक्री केंद्रावर उपलब्ध करुन ठेवणे त्यावर नियंत्रण ठेवणे हे या विभागामार्फत बघितले जाते सदर कामाचे नियंत्रण पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागामार्फत करण्यात येते.