महाराष्ट्र सह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांत वाढणारा कोरोनाचा आकडा दररोज शंभर नुसार वाढणारी राज्यातील संख्या पहाता आणखी काही दिवस महाराष्ट्रासह इतर पाच राज्यातुन येणाऱ्या नागरिकांना कर्नाटकात नो एन्ट्री करण्यात आली आहे. राज्यात 2500 पार कोरोना पोजिटीव्ह रुग्ण झाले आहेत त्यामुळे याची धास्ती घेत नो एन्ट्री वाढवण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्र,तामिळनाडू,राजस्थान ,गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातून येणाऱ्याना प्रवेश बंदी यापूर्वीच केली आहे.आता कर्नाटक सरकारने प्रवेश बंदीची मुदत आणखी पंधरा दिवस वाढवली आहे.
प्रवेशबंदीची मुदत 31 मे रोजी संपणार होती पण महाराष्ट्रासह पाच राज्यातून येणाऱ्यामुळे करोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.त्यामुळे या पाच राज्यातून येणाऱ्या लोकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कायदामंत्री मधूस्वामी यांनी सांगितले की या पाच राज्यातील लोकांना विमान,रस्ता किंवा रेल्वेतून येण्यास बंदी घालण्यात आली आहे.रेल्वे खात्याच्या जनसंपर्क अधिकारी विजया यांनी सांगितले की कर्नाटक सरकारच्या नियमावलीनुसार राज्यात रेल्वे सेवा सुरू आहे.