गेले 55 दिवस लॉक डाऊनमुळे बंद असलेलं बेळगावं बस स्थानक सुरू होणार असून मंगळवारी सकाळी पासून बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बस सेवा सुरू होणार आहे.
बेळगाव सह राज्यभरात बस सेवा बहाल केली जाणार आहे त्यानुसार बेळगाव सेंट्रल बस स्थानाकात देखील बस सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. बस स्थानकात प्रवाश्यांनी सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक असणार आहे त्यासाठी प्रवाश्यांना थांबण्यासाठी मार्किंग देखील करण्यात आले आहे. उद्या पासून सुरू होणाऱ्या बस पार्किंग चे मार्किंग होणे बाकी आहे.
Nwkrtc नियंत्रण अधिकारी महादेवप्पा मुंजी यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानकात बस सुरू करण्यासाठी तयारी केली जात आहे.बस स्थानकावर एकचं एंट्री तर एकच एक्झिट पॉईंट करण्यात आला आहे.बस स्टँडला येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कनिंग तपासणी केली जाणार आहे व सॅनिटायजर स्क्रिनिंग मशीन देखील बसवली आहे.
एका बस मधून केवळ 30 जणांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार असून तिकिटांचा दर सायंकाळी ठरवला जाणार आहेय शिवाय बे5 जिल्ह्यात 252 बस धावणार आहेत अशी माहिती मुंजी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी बस सेवा सुरू केली जाणार असून प्रवाश्यांच्या आरोग्याचा दृष्टिकोन समोर ठेऊन सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत सूचना केल्या आहेत बस वाहक चालक व प्रवाश्यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.परिवाहन मंडळाचे 50 वर्षावरील कर्मचारी ड्युटीवर असणार नाहीत.प्रवाश्यांच्या मागणी अनुसार बस संख्या वाढवली जाणार आहे अशी माहिती देखील मुंजी यांनी बेळगाव Live शी बोलताना दिली.