कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक जण घरीच बसून आहेत. त्याचबरोबर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. शाळा महाविद्यालय यापूर्वीच सुट्टी देण्यात आली आहेत. मात्र यामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 20 मेपर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुट्टी असतील असे केंद्रीय मंत्र्यांनी सुचविले आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच केंद्रस्तरीय उच्च अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळा आणि महाविद्यालय 20 मेपर्यंत सुट्टी द्यावीत अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच आता या आदेशाचे पालन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संपूर्ण देशातील लॉक डाऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालय वीस पर्यंत सुट्टी असतील असे सांगण्यात आले आहे. अजूनही लॉक डाऊन वाढवणार की थांबवणार ही चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय मंत्रिमंडळाने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वत्र लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार आता शिक्षणाधिकाऱ्यांनी ही सुरू केला आहे.
केंद्र सरकारच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये शाळा-महाविद्यालयात बरोबरच इतर धार्मिक कार्यक्रम मध्येही निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यामुळे किरोणाची संकट दूर होईपर्यंत तरी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे दिसून आले. सध्या कोरोणाची धास्ती वाढतच चालली असून अनेकदा यामध्ये दगावले ही आहेत आता शाळा महाविद्यालय बंद ठेवून कोरोनावर मात करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 20 मेपर्यंत तरी शाळा महाविद्यालय बंद असतील असा आदेश या बैठकीत करण्यात आला.