सुळेभावी तालुका बेळगाव येथील डोंगरात दिल्लीहून परतले काही तिघे संशयित असल्याच्या घटनेने खळबळ माजली होती. या परिसरातील तरुणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र डोंगरात ते लपून बसले असून अजूनही त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ते तबलीग समाजातील अनोळखी नसून बायकोकडून भांडून गेलेला दादला असल्याचे आढळून आले आहे. मारिहाळ स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय कुमार शिन्नुर यांनी या प्रकरणाचा तपास लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काही तबलीग की समाजातील अनोळखी सुळेभावी डोंगरात लपून बसल्याची माहिती होती. मात्र ही माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची सर्व ती चौकशी करून याबाबतचे सत्य सामोर आणले आहे. वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात पेक्षा सध्याच्या परिस्थितीत देश जात आहे याकडे नागरिकांनी अधिक लक्ष द्यावे असेही आवाहन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंनुर यांनी नागरिकांना केले आहे.
सुळेभावी गावात या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती. कोणतेही अनर्थ होऊ नये यासाठी पोलीसानाही याबाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी हेळसांड केल्याचे सांगण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नुर यांनी याबाबत सखोल चौकशी करून यावर अखेर पडदा टाकण्यात यश मिळवले आहे. नागरिकांनी अफवा पसरवण्या पेक्षा सत्य विचारात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
राजेश रामापा कोलकार रा.आंबेडकर गल्ली सुळेभावीच्या 36 वर्षीय इसमाने आपल्या बायकोशी भांडण काढून बॅग सह डोंगरात आश्रय घेतला होता असे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे.
ज्या ठिकाणी अनोळखी होते त्या ठिकाणी एक बॅग सापडली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ती बॅग संबंधित भांडण काढून गेलेल्या नवऱ्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार असे प्रकार घडत आहे. त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून सुरक्षित अंतर ठेवून घरात रहावे असे आवाहन विजयकुमार यांनी केले आहे.