हेल्मेट व्यवसायात नावलौकिक कमावलेल्या वेगा हेल्मेट कंपनीने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी वायजर युक्त ऑप्टिक फायबर आणि मास्कचे मोफत वितरण करून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले आहे.शहापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी हे मास्क वितरण केलं करत योगदान दिले आहे.
कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी हे मास्क आणि ऑप्टिक फायबर युक्त मास्क उपयुक्त ठरणार आहेत मास्क घातल्यावर विषाणू नाकात,तोंडात जाण्यापासून प्रतिबंध होतो पण डोळे उघडे असतात .
![Vega helmetes](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/04/FB_IMG_1586365288848.jpg)
विषाणू डोळ्यातून देखील प्रवेश करू शकतात.हे ध्यानात घेऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करून चांगल्या दर्जाचे मास्क तयार केले आहेत.त्यामुळे विषाणूंना प्रतिबंध होतो.काही जण हेल्मेट वापरत नाहीत.त्यांच्यासाठी म्हणून ग्लास शिल्डची निर्मिती केली आहे.ग्लास शिल्ड निर्मिती करण्यासाठी ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात आला आहे.
वेगा हेल्मेट यांनी जवळपास 50 हुन अधिक मास्क ऑप्टिक फायबर मास्क आणि ग्लास शिल्ड पोलीस आणि पत्रकार यांना मोफत वितरित केले आहेत.शहापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी हे मास्क आणि ग्लास शिल्ड पोलीस आणि पत्रकारांना वितरित केले आहेत.
शहापूर पोलीस स्थानक,मार्केट पोलीस स्थांनक,ए पी एम सी आणि मार्केट ए सी पी यांच्या पथकातील काही पोलिसांना व निवडक पत्रकार छायाचित्रकाराना जवळपास 50 हुन अधिक वायजर युक्त ऑप्टिक फायबर शिल्ड व मास्क वितरित करण्यात आले.