इकडे कोरोनाच्या भक्तीमुळे हजार लग्न रद्द झाले असून दुसरीकडे ऑनलाइन साखरपुड्याचे चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. अनेक ठिकाणी लॉक डाऊन झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र अनेकांनी यावर पर्याय शोधून आपले विधी पद्धतीने कामे उरकून घेण्यात धन्यता मानत आहेत. सध्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात एका ऑनलाईन साखरपुड्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
विवाह आणि त्याच्याशी संबंधित विविध विधींना भारतीय परंपरेनुसार महत्त्व आहे. हे महत्त्व जाणूनच आता अनेकजण विविध उपाययोजना शोधून काढू लागले आहेत. पण कोरोनाच्या थैमानामुळे या सगळ्याला फाटा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रितीरिवाज आला फाटा देण्यापेक्षा सुरक्षित अंतर ठेवूनच सगळे कार्यक्रम करण्यात नागरिकही धन्यता मानू लागले आहेत.
हुक्केरी तालुक्यातील अतिहाळ सरकारी माध्यमिक डी बी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश उर्फ पी. डी. पाटील यांची (रा. संकेश्वर) कन्या अनुष्का आणि बागलकोट येथील सुरेश मलकाजप्पा अरकेरी यांचे पुत्र महांतेश यांचा साखरपुडा चक्क ऑनलाइन करण्यात आला. त्यामुळे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सोमवारी (ता.६) संकेश्वरमधील पाटील फार्महाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमास मोजकीच मंडळी उपस्थित होती.
कोरोनामुळे लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे. जमावबंदीमुळे गर्दी करण्यावरही निर्बंध आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी सरकारच्या सूचनांचे सक्तीने पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच हा साखरपुडा ऑनलाइन करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी सामाजिक अंतरही ठेवण्यात आले. अंगठी अथवा पुष्पहार परिधान न करता वाद्यांच्या निनादाविना अनुष्काचा विवाह महांतेश अरकेरी यांच्यासमवेत ऑनलाईन केला.
याबात बोलताना वधूचे वडील प्रकाश पाटील म्हणाले, ‘कोरोनाचा कहर जोरात सुरू आहे. त्यामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे वधू व वराकडील मंडळी तसेच नातेवाईकांनी एकत्र येणे कठीण होते. म्हणूनच कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा कार्यक्रम व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ऑनलाईन पूर्ण करण्यात आला.