Saturday, April 27, 2024

/

ब्रेकिंग… बेळगावात कोरोना दाखल -तिघे पोजिटिव्ह -शेट्टर यांचा दुजोरा

 belgaum

शुक्रवार 3 एप्रिल लॉक डाऊनचा दहावा दिवस बेळगाव शहरासाठी अनलकी ठरला आहेत गेले कित्येक दिवस झिरो पोजिटिव्ह असलेला आकडा या दहाव्या दिवशी तीन वर पोहोचला असून प्राण घातक कोरोना विषाणूने बेळगावात एंट्री मारली आहे.

बेळगावात तीन कोरोनाचे पोजिटिव्ह रुग्ण आहेत अशी अधिकृत माहिती पालकमंत्री जगदिश शेट्टर यांनी  धारवाड मध्ये दिली आहे. इतके दिवस नॉर्मल असलेल्या बेळगाव मध्ये तिघे पोजिटिव्ह आढळल्याने अधिक काळजी बेळगावकडे दिली जाईल असेही त्यांनी नमूद केलं आहे एकीकडे शेट्टर यांनी माहिती दिली असताना जिल्हा प्रशासनाने अध्याप मेडिकल बुलेटिन किंवा कोणती माहिती दिलेली नाही.

शुक्रवारी सकाळी पासूनच शहरात कोरोनाचे पोजिटिव्ह रुग्ण असल्याची बातमी फिरत होती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी जनतेला संयम बाळगावा कोणत्याही अफवाना बळी पडू नये घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

 belgaum

दोन रुग्ण तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागातील तर एक रुग्ण शहरातील असे तिघेही दिल्ली रिटर्न आहेत.सकाळी पासून एका इंग्लिश वृत्त वाहिनीने तिघे रुग्ण पोजिटिव्ह असल्याचे वृत्त दिले होते त्यानंतर बेळगावभर ही बातमी वाऱ्या सारखी पसरली होती.

दिल्लीहून बेळगावला परतलेल्या त्या 62 पैकी 33 जणांचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यातील तिघे पोजिटिव्ह आहेत.दिल्लीत तबलीग जमातीच्या मर्कस या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगावातील 62 जण गेले होते  व बेळगावला परतले होते. दोन 30 वर्षा खालील युवक  तर एक 62 वर्षीय वृद्धास  कोरोनाची बाधा झाली आहे. या  बाधितांच्या संपर्कात कोण कोण आहे याचा देखील शोध घेतला जात आहे.

शेट्टर यांचा व्हीडिओ पहा खालील लिंक वर

बेळगावात तिघे कोरोना पोजिटिव्ह- पालकमंत्री जगदीश शेट्टर यांचा दुजोरा -नेमकं काय म्हणाले शेट्टर पहा खालील व्हीडिओ#coronaenteredbelgaum#belgaumLivenews#jagdishshettar#threepositivecovid19

Posted by Belgaum Live on Friday, April 3, 2020

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.