केदनूर व उचगाव परिसरात ग्राहकांची लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे काही ग्रामपंचायत सदस्य कडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार जे दर निश्चित आहेत ते सदर ग्राहकांना द्यावेत असे एका पत्रकाद्वारे कळविले होते. मात्र त्यांच्या पत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
लॉक डाऊन असल्यामुळे अनेकांची मोठी गोची झाली आहे. साहित्य खरेदी करण्यापासून ते दुधा पर्यंत मोठ्या येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत दुकानदारांनी मात्र ग्राहकांची लूट करण्यात सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा फायदा अनेक दुकानदार घेत आहेत. मात्र याचे तक्रार केल्यास कोणतीही दखल घेत नसल्याचे उघडकीस येत आहे. असाच प्रकार केदनूर मध्ये घडला आहे.
केदनूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या दुकानदारांना साहित्याचे दर वाढवू नये अशा पत्रक ही वितरण करण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेकांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत यांच्यावर कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. किरकोळ साहित्यासह इतर साहित्याचे दर वाढविण्यात आल्याने मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित ग्रामपंचायतीने प्रत्येक दुकानदाराला निश्चित वेळेत दुकान सुरू करण्याचे सांगितले आहे. निश्चित वेळेत दुकान सुरू झाली असली तरी साहित्याचे दर मात्र डबल करून ते विक्री करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या पत्रक वितरण यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयराम बुरली, सुरेश अंगडी, चोळाप्पा लाड , पोलीस मोकाशी, क्लार्क निंगाप्पा पाटील आधी हे पत्रक देऊन दर वाढू नये असे सांगितले होते. मात्र त्यांच्या या पत्रकाराला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्राहक आतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उचगावात ही किराणा दुकानदारांकडून लूट
उचगाव परिसराची किराणा करून लूट सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली असली तरी याकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष करून अनेकांना आर्थिक अडचणी टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. याचा विचार गांभीर्याने होण्याची गरज निर्माण झाली आहे. जर अशीच लूट सुरू असल्यास अनेक जण उपाशी मरण्याची वेळ येणार आहे. याचा विचाराचा ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.