Friday, April 26, 2024

/

ब्रेकिंग न्यूज.. बेळगावात सापडले आणखी चार कोरोनो पोजीटिव्ह

 belgaum

लॉक डाऊनच्या दहाव्या दिवशी तीन कोरोनो पोजीटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर बेळगावात आणखी नवीन चार पोजीटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यामुळे बेळगावात एकूण पोजीटिव्ह कोरोनो रुग्णांची संख्या सात वर पोहोचली आहे.

New 4 corona positive
New 4 corona positive

रविवारी पाच एप्रिल रोजी राज्य आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये आणखी नवीन चार पोजीटिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.या चार रुग्णांत तीन महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. या चारी जणांना बेळगावातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे रुग्ण देखील दिल्ली येथील तबलीग जमातीच्या मरकज कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या पैकीच आहेत ते मूळचे रायबागचे आहेत. अनुक्रमे 36,37 आणि 41 वयाच्या महिला तर 36 वयाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. एकूण पाठवलेल्या अहवाला पैकी 6 नमुन्यांचे रिपोर्ट येणे बाकी होते त्यातील हे चार पोजीटिव्ह असण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.