Thursday, December 19, 2024

/

बेळगावसह राज्यातील 18 हॉटस्पॉट जिल्हे होणार “सील”?

 belgaum

जीवघेण्या कोरोना विषाणूची साथ अद्यापही आवाक्याबाहेर असल्यामुळे राज्यातील “लॉक डाऊन”चा कालावधी 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्याबरोबरच बेळगांवसह 18 हॉट स्पॉट जिल्हे “सील डाऊन” करण्याची शिफारस राज्याच्या टास्क फोर्स सल्लागार समितीने सरकारकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृह मधील विविध पक्षांच्या नेत्यावर बरोबर केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगप्रसंगी देशव्यापी लॉक डाऊन एकदम मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात राज्याच्या टास्क फोर्स सल्लागार समितीने कर्नाटकातील लॉक डाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याबरोबरच कोरोना बाधित हॉट स्पॉट जिल्हे “सील डाऊन” करण्याची शिफारस केली आहे. तथापि पांच पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या जिल्हामध्येच हा आदेश लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील हॉट स्पॉट जिल्ह्यांमध्ये बेळगावसह बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, म्हैसूर, मंगळूर, चिकबळ्ळापूर, कलबुर्गी, बेळ्ळारी, बिदर, मंड्या, बागलकोट, दावणगिरी, कोडगु, तुमकुर, धारवाड आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

Lock down logo
Lock down logo

दरम्यान, राज्यातील शाळा कॉलेजेस येत्या 31 मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे. तसेच बससेवा, रेल्वेसेवा, विमानसेवा आणि मेट्रोसेवा येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवावी, असेही सुचविण्यात आले आहे.
सरकारच्या सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीं पैकी सील डाऊनची त्वरित अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारने “सील डाऊन”चा आदेश जारी केल्यास कोरोना प्रादुर्भाव असलेला भाग केला जाणार आहे. या सील डाऊनच्या कालावधीत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सील डाऊन म्हणजे शंभर टक्के बंद असणार असून दूध, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास नागरिकांना सरकारी सहाय्यवाणीशी संपर्क साधून संबंधित वस्तू ऑनलाईन मागवाव्या लागणार आहेत. सील डाऊन असलेल्या भागात ऍम्ब्युलन्स आणि पोलिस वाहन खेरीज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही सील डाऊन भागात जाण्यास बंदी असेल. राज्याच्या सल्लागार समितीने केलेल्या शिफारशींमध्ये गुटख्यावर बंदी घालण्याच्या शिफारशीचाही समावेश असल्याचे समजते.

1 COMMENT

  1. Aas zal tar aami kay karayache aami govamadye aahe aamala jevan milat nahi kase karayache mi khanapur taluka madala aahe kahitari kara madat kara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.