कोरोनामुळे लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सारेजण घराबाहेर पडण्यास धजत नसले तरी वैद्यकीय सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मागील पाच ते सहा दिवसांपासून सेवा बजावणाऱ्या सुनंदा कोरिकोप यांची आणि मुलीची झालेली ताटातूट हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर तसेच प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या नर्सेसच्या दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुनंदा यांचे कौतुक केले आहे.
मागील 13 ते 14 दिवसापासून लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे कोणच घराबाहेर पडण्यास धजत नाहीत. असे असले तरी वैद्यकीय सेवा मात्र प्रामाणिकपणे डॉक्टर्स नर्स काम करत आहेत. अशा अवस्थेत डॉक्टर नर्स यांच्या घरातील परिस्थिती काय असेल याचाही विचार करणे गरजेचे असताना नुकतीच बेळगावात घडलेल्या घटनेमुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. मायलेकीची झालेले ताटातून याचे वास्तव वादी चित्र सर्व वृत्तवाहिन्यांनी दाखविले.
बेळगाव जिल्ह्यात सात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. अशा परिस्थितीत नर्सेस व डॉक्टरांना घरी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून नर्सेस व डॉक्टर लॉजवर राहत असल्याची घटना समोर आल्या आहेत. ही घटना लक्षात घेऊन मागील चार दिवसापासून मुलीची भेट न झालेल्या सुनंदा यांनी मुलीची भेट घेतली. मात्र मुलीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि हा व्हिडिओ व्हायरल होताच याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन सुनंदा यांचे कौतुक केले आहे.
सुनंदा यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रामाणिक कामाबद्दल कौतुक केले आहे. तुम्ही सुरू ठेवलेले अविरत कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. तुमच्या कार्याला आमचा सलाम असून तुमच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. असेच कार्य करत राहा आणि देशसेवेचा हातभार लावत राहा असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमत्र्यांनी नर्स सुनंदा यांचा उत्साह -पहा मुख्यमंत्र्यांचा आवाज..फक्त बेळगाव live वर
माय लेकी समोरासमोर असूनही एकमेकांना भेटता आले नाही.आई मला घे,आई मला घे असे म्हणून रडणारी मुलगी आणि दुरूनच मुलीला हात करून आसवे गाळणारी नर्स आई हा व्हिडीओ केवळ बेळगावात नव्हे तर राज्यातही व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी हा व्हिडीओ पाहून नर्स सुगंधा यांना फोन करून कोरोनाशी लढण्यासाठी तुम्ही आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे.तुमचे कार्य सगळी जनता सदैव।स्मरणात ठेवेल.चांगले कार्य करत आहात.तुम्हाला शुभेच्छा असे येडी युरप्पा यांनी सुगंधा यांना सांगितले.
मुख्यमत्र्यांनी वाढवला नर्स सुनंदा यांचा उत्साह -पहा मुख्यमंत्र्यांचा आवाज..फक्त बेळगाव live वरमाय लेकी समोरासमोर…
Posted by Belgaum Live on Wednesday, April 8, 2020