अनेकजण बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विकत आहे. त्याचबरोबर गावठी दारूकडेही अनेकांचा ओढा वाढला आहे. मात्र संपूर्ण देशात लॉक डाऊन परिस्थिती असल्यामुळे दारू विकणार्यावर तयार करणाऱ्यावर धाड टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. नुकतीच काकती येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून तेथील रसायन नष्ट करण्यात आले आहे.
लॉक डाऊनच्या काळात गावठी दारूचा पुरवठा वाढला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अबकारी व पोलीस दलाने गावठी दारुविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी पहाटे काकती पोलिसांनी सुमारे 40 टय़ूबमध्ये साठवून ठेवलेला गावठी दारू नष्ट केली आहे.
काकती गावापासून जवळच महामार्गालगत रबरी टय़ुबमधून गावठी दारूचा साठा ठेवण्यात आला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा साठा बेळगाव शहरात पाठविण्याची तयारी सुरू होती. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून दारूसाठा नष्ट केला.
पोलिसांनी छापा टाकताच दारू वाहतूक करण्यासाठी जमलेले 10 हून अधिक जण तेथून फरारी झाले. जर पोलिसांनी छापा टाकले तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपल्याजवळ शस्त्रेही ठेवली होती. दारू वाहतूक करण्यासाठी जमलेले तरुण मुत्य़ानट्टी गावचे असल्याचे समजले असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत ग्रामीण भागात सध्या गावठी दारूचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी धाड टाकण्यास सुरुवात केली आहे.