कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलसह राज्यातील एकूण 8 हॉस्पिटल्स ही कोरोना बाधितांसाठी समर्पित हॉस्पिटल्स म्हणून घोषित केली आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी समर्पित 8 हॉस्पिटल्समध्ये बेळगावच्या बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्सचा समावेश आहे. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रायचूर, कोडगु इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कोडगु, मंड्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मंड्या, हासन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हासन, बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बेळगाव, कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स धारवाड आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कोप्पळ अशी उपरोक्त आठ हॉस्पिटल्सची नावे आहेत. राज्यातील ही आठही हॉस्पिटल्स सार्वजनिक असून सर्वच्या सर्व कार्यान्वित आहेत.
या सर्व हॉस्पिटल्समधील एकूण आसोलेशन बेडस् ची संख्या 1540 असून आयसीयू बेडस् 250 आहेत, तर या ठिकाणची एकूण व्हेंटिलेटरची संख्या 130 इतकी आहे. या सर्वांची विभागणी अनुक्रमे आयसोलेशन बेड्स, आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स अशी पुढीलप्रमाणे आहे. रायचूर हॉस्पिटल – आयसोलेशन बेड्स 150, आयसीयू बेड्स 36, व्हेंटिलेटर्स 6. बिदर हॉस्पिटल – 300,16, 8. कोडगु हॉस्पिटल – 100, 20, 8. मंड्या हॉस्पिटल – 100, 22, 28. हासन हॉस्पिटल – 350, 50, 12. बेळगांव हॉस्पिटल – 190, 10, 17. धारवाड हॉस्पिटल – 200, 46, 46. कोप्पळ हॉस्पिटल – 150, 50, 5. यापैकी कोप्पळचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वगळता अन्य सर्व हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजची आहेत.