मागील दहा ते बारा दिवसापासून देशासह कर्नाटक राज्यातील लॉक डाऊन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावातील ही अनेक व्यवसाय धारकांना याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असताना काही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काही किराणा दुकान धारकांना सुरू ठेवण्याचे आदेश देणे देण्यात आले होते.
आता बेकरी आणि स्वीट मार्ट चालकांनाही दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारचे सचिव राजेंद्रकुमार कटारिया यांनी याबाबतची घोषणा केल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील बारा दिवसांपासून लॉक डाऊन झाल्यामुळे व्यवसायाला फटका बसला होता. महत्वाचे म्हणजे लहान मुलांचा आवडता आणि चहा साठी लागणारा बेकरीतील अनेक पदार्थ तसेच स्वीट मार्ट मधील पदार्थ बंद असल्याने हिरमोड झाला होता. आता पुन्हा स्वीट मार्ट आणि बेकरी सुरू करण्याचा आदेश दिल्याने अनेक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
सरकारने दिलेल्या पत्रकात बेकरी व स्वीट मालकांनी दर्जात्मक पदार्थ ठेवून त्याचे वितरण करावे. याचबरोबर कामगार कमीत कमी वापरावेत आणि नियमांचे पालन करावे, सुरक्षित अंतर ठेवूनच दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी असेल, जे काही जुने साहित्य आहे ते ग्राहकांना देऊ नये यासह इतर नियम हे लागू करण्यात आले आहेत. याची दखल बेकरी आणि स्वीट मार्ट मालकांनी घ्यावी असे आवाहन आणि त्या पत्रकात करण्यात आले आहेत.
स्वीट मार्ट आणि बेकरी मधील होलसेल धारकांनी ज्या किरकोळ विक्रेत्यांना मालक पोचवायचा आहे त्याचा दर्जा उत्तम असणे आवश्यक आहे. योग्य वेळेतच हा माल पोचवावा विक्रेत्यांनीही सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला ग्राहकांना द्यावा आणि नियमांचे पालन करावे असा असे आदेशात म्हटले आहे. यामुळे स्वीट मार्ट आणि बेकरी धारकांना दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. दोन्ही दुकाने सुरू केल्यामुळे ग्राहक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.