Sunday, April 28, 2024

/

शहरात बुडा बसवणार डिस इन्फेक्शन युनिट

 belgaum

भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगावातील यशवंत कास्टिंग या उद्योग समूहाने तयार केलेल्या अद्ययावत “डिसइन्फेक्शन चेंबर” अर्थात निर्जंतुकीकरण कोठडीची सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसह आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच बुडातर्फे आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरात या डीसइन्फेक्‍शन चेंबरचे कांही युनिट बसविली जाणार आहेत.

बेळगावातील यशवंत कास्टिंग या कंपनीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास निर्जंतुकीकरण कोठडी (डीसइन्फेक्‍शन चेंबर) निर्माण केली आहे. पॉली कार्बोनेट पॅनल्स आणि शीट्सने बनविण्यात आलेल्या या पारदर्शक कोठडीला दोन दरवाजे असून प्रवेशद्वारावर सॅनीटायझरची बाटली ठेवण्यात आली आहे. त्याने हात धुऊन कोठडीत प्रवेश केल्यानंतर अॅटोमॅटिक सेन्सरद्वारे कोठडीतील निर्जंतुकीकरण प्रणाली कार्यान्वित होते. ही निर्जंतुकीकरण प्रक्रिया संबंधित व्यक्ती कोठडीतून बाहेर पडेपर्यंत सुरू राहते, त्यानंतर अॅटोमॅटिक सेन्सरद्वारे ती बंद होते. सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सदर “डीसइन्फेक्‍शन चेंबर” अतिशय प्रभावी ठरणार असल्याचा दावा यशवंत कास्टिंगचे वीरधवल उपाध्ये यांनी केला आहे.

Yashwant sanitization chamber
Yashwant sanitization chamber

याची दखल घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही.  आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यशवंत कास्टिंगच्या डीसइन्फेक्‍शन चेंबरची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक माहिती घेतली. तसेच डीसइन्फेक्‍शन चेंबरची निर्मिती करणाऱ्या यशवंत कास्टिंगबद्दल प्रशंसोद्गार काढले. याप्रसंगी वीरधवल उपाध्ये यांनी प्रात्यक्षिकासह डीसइन्फेक्‍शन चेंबरची माहिती दिली. सदर डीसइन्फेक्‍शन चेंबरचे महत्त्व लक्षात घेऊन आता बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडातर्फे आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरात या
डीसइन्फेक्‍शन चेंबरचे कांही युनिट बसविली जाणार आहेत.

 belgaum

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यशवंत कास्टिंगचे वीरधवल उपाध्ये यांनी सदर “डीसइन्फेक्‍शन चेंबर” प्रात्यक्षिक सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्यातर्फे आज सोमवारी या डीसइन्फेक्‍शन चेंबरच्या कार्याची प्रत्यक्ष शहानिशा करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.