प्रशासनाने बेळगाव ए पी एम सी मध्ये भाजी विक्री साठी परवाना युक्त गाड्या तयार केल्या आहेत. गल्लोगल्ली त्या गाड्या होम डिलिव्हरी देत आहेत. सोशल डिस्ट्नस आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. मात्र शेतकऱ्यांना ए पी एम सी मध्ये भाजी विक्री करण्यासाठी मज्जाव केल्याने, शेतकऱ्यांचा माल आता तसाच पडून राहणार आहे.
रविवारी सकाळीची घटना कंग्राळी, अलतगा, कडोली भागातून अनेक शेतकरी आपापल्या गाडीतून जमेल तसं भाजी घेऊन विक्रीसाठी दाखल झाले होते, मात्र त्यांना ए पी एम सी त जाऊ दिले नाही त्यांना कंग्राळीत अडवण्यात आलं.सामाजिक भान बाळगून सुरक्षित अंतर ठेवत जर शेतकऱ्याने आपला माल घेऊन ए पी एम सीत जाऊन विकल्यास योग्य होईल. मात्र ए पी एम सी मध्ये गर्दी होत असल्याने भाजी विक्रीसाठी ए पी एम सीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना मज्जाव करण्यात आला त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.
जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मागणी केली आहे की, प्रशासनाने जशाभाजी विक्रीसाठी गाड्या सोडल्या आहेत त्या प्रमाणे शेतकऱ्याच्या बांधाला जाऊन माल खरेदीसाठी परवाने देऊन भाजी खरेदीसाठी गाड्या सोडाव्यात आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे व जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाचा मार्ग सुखकर करावा अशी मागणी केली आहे.
सोशल डिस्ट्नस पाळून या गोष्टी केल्या तर गरीब शेतकऱ्यांचे नुकसान टळेल व आरोग्यही सुरक्षित राहील व कोरोनाचा धोका ही टळेल असे त्या म्हणाल्या.