रस्त्यावर खेळाचा डाव मांडून बेळगावच्या जनतेने पाळलेल्या कर्फ्युला काही उत्तर भारतीयांनी हरताळ फासला आहे.बेळगावची जनता नेहमीच बेळगाववरती प्रेम करत आलेली आहे.
गावाच्या हितासाठी शेतकऱ्यांनीही शेतात जायचं सोडलं,हातावरच पोट असणाऱ्या कामगारांनी पोटाला चिमटा देत घरात बसणं पसंत केलं, अनेक जणांनी महत्वाची कामं बाजूला ठेवत उंबरठा देखील ओलांडला नाही, अश्या वेळी काही उत्तर भारतीय लोकांची आपल्या गावालाच वेठीला धरण्याची वृत्ती रक्त पिपासू वाटते.
बेळगाव शहरातील नर्तकी प्लाझा या अपार्टमेंट समोर काही उत्तर भारतीयांनी क्रिकेटचा डाव मांडला होता.या अपार्टमेंट मधील लोकांना भाजप नेते किरण जाधव यांनी घरा बाहेर न पडण्याची विनंती करून देखील त्यांना आपल्या लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.टक्केवारीने जनतेचे शोषण करणाऱ्यांना गावालाही वेठीस धरनं अवघड वाटलं नाही.
एका राष्ट्रीय पक्षात कार्यरत बेळगावातील काही उत्तर भारतीय नेते भरपूर टिमकी वाजवत असतात त्यांनी अश्या कूपमंडुक लोकांना ज्ञान देण्याची गरज आहे.