जीवघेण्या कोरोनाच्या थैमाना मुळे दहावीची परीक्षा पुढे ढकलल्या नंतर कर्नाटक शासनाने आता शाळेच्या शिक्षकांना देखील रजा घोषित केली आहे.
सकाळी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी खास बैठक घेत 27 मार्च पासून होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश बजावला होता त्या नंतर आता शिक्षकांच्या बाबतीत ही बातमी आली आहे.
गेल्या आठवड्या पासून शाळांना सुट्टी दिली असली तरी शिक्षक मात्र शाळेत कॉलेज मध्ये जात होते आता या नवीन आदेशा नुसार कर्नाटक राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि कॉलेज च्या शिक्षकांना देखील 31 मार्च पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान राज्यासह बेळगाव आणि देशभरात रविवारी पूर्ण दिवस जनतेचा कर्फ्यु म्हणून दिवस पाळण्यात येत आहे त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.