देशातील सगळी जनता स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळत असताना एक महिला आमदाराला मात्र जनता कर्फ्युशी आपल्याला काहीच देणे घेणे नसल्याचे वर्तन केले आहे.जनता कर्फ्युच्या दिवशी बेळगावातील जनता घरात बसून असतांना त्या आमदारांनी चक्क आपल्या कार्यकर्त्यांना मेजवानी दिली.
आपल्या घरासमोरच मांडव घालून त्यांनी भोजनाची व्यवस्था केली होती.एका पत्रकाराने व्हीडिओ शूटिंग केले असता हट्ट करणाऱ्या त्यांच्या बंधूनी त्या पत्रकाराचा मोबाईल काढून घेवून त्यातील व्हीडिओ डिलीट करायला लावला.नंतर त्या पत्रकाराला धमकी देखील दिली.
ही बातमी,फोटो,व्हीडिओ दाखवला तर सोडणार नाही अशी धमकी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश जनता कर्फ्यु पाळत असताना महिला आमदाराने शंभरहून अधिक लोकांना जेवण घालणे योग्य आहे काय?आमदार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की नाही असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्ते मास्क वाटत असताना महिला आमदाराने अकलेचे तारे तोडत चक्क कर्फ्यु दिवशी जेवणावळ घालत आपली बधिरता सिध्द केली. उत्तर भारतीय लोकांनी घरात बसण्या ऐवजी क्रिकेट खेळत आजच्या ऐतिहासिक दिवसाला हरताळ फासल असताना या आमदराने मात्र जेवणावळ दिली आहे.