Thursday, April 18, 2024

/

लाच स्वीकारणाऱ्या पिडीओला कारावास

 belgaum

मालमत्तेवर बोजा चढविण्यासाठी लाच घेतलेल्या पीडिओला तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार रु दंड न्यायालयाने ठोठावला आहे.खानापूर तालुक्यातील कोडचवाड गावचा प्रभारी पीडिओ महाबळेश्वर इटगेकर असे त्या पीडिओचे नाव आहे.

अवरोळी गावचा वीरभद्र कोलकार याच्या मालमत्तेवर बोजा चढवायचा होता.यासाठी इटगेकर याने 1400 रु ची मागणी केली होती.1400 रु लाच स्वीकारताना इटगेकर याला लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते.

चौथ्या अतिरिक्त जिल्हा सत्र विशेष न्यायालयात हा खटला चालला होता.न्या.विजय व्ही.यांच्या समोर सुनावणी झाली होती.

 belgaum

लोकायुक्त पोलीस अधिकारी गोपाळ जोगीन यांनी प्रकरणाचा तपास केला होता.या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.