गुडी पाढव्याच्या सणावार कोरोनाचे सावट पसरले आहे.त्यामुळे जनतेने घरातच आपल्या परीने जमेल तसा सण साजरा करण्याची वेळ आली आहे.गुडी पाढावा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.बांधकामाचा शुभारंभ,वास्तुशांती,नव्या उद्योगाचा प्रारंभ या मुहूर्तावर केले जातात.पण या वर्षी ते शक्य नाही.
सोने खरेदी तर मोठ्या प्रमाणावर केली जाते पण कोरोनामुळे या सगळ्यावर पाणी फिरले आहे.कोरोनाशी सद्य परिस्थितीत सगळ्यांनी संयम बाळगून घरी बसून करणे काळाची गरज आहे.कोरोनाचा नायनाट झाल्यावर पुन्हा आपले नेहमी सारखे रुटीन सुरू होणार आहे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी देखील गर्दी करू नये.कोणत्याही जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला आवश्यक आहे तितकीच खरेदी करावी.रोज राबून खाणारे रोज बाजारहाट करून चूल पेटवतात.त्यामुळे आपण संयम खरेदी करताना बाळगायला हवा.
आपण सगळयांनी पुढील दिवस भविष्याचा विचार करून वागायला पाहिजे. व्हाट्सअपवर येणाऱ्या सगळ्या बातम्या खऱ्याच असतात असे नाही त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करून जनतेत घबराट निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.आपण सगळ्यांनी निर्धार करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे.गर्दी न करता आवश्यक असेल तेव्हाच प्रशासन ठरवून देईल त्या वेळेलाच आपण बाहेर पडावे.
प्रत्येकाने काळजी घेतली तर हे कोरोनाचे सावट लवकरच दूर होईल यात शंका नाही.स्वयंम नियमन हेच कोरोना उपाय योजन आहे त्यामुळे संयम बाळगा..