Sunday, April 28, 2024

/

या अमानुष वर्तनाला केंव्हा बसणार आळा?

 belgaum

सध्या सर्वत्र लॉक डाऊन असले तरी अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना तसेच जीवनावश्यक वस्तूंची गरज असलेल्यांना घराबाहेर पडण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे. तथापि पोलीस खात्याकडून संबंधितांना नाहक मारझोड करण्याचे प्रकार घडत असल्याने तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लोक डाउनले तरीही अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना घराबाहेर पडण्यास सूट देण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी देखील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला घराबाहेर करता येऊ शकते, असे खुद्द प्रशासनाने जाहीर केले आहे. तथापि प्रशासनाच्या या घोषणेनेकडे पोलीस खात्याने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता पोलिसांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार टिळकवाडी येथील एक व्यक्ती शनिवारी सायंकाळी कुटुंबासाठी दूध आणण्यास घराबाहेर पडली होती. त्यावेळी पोलिस व्हॅनमधून आलेल्या चार पोलिसांनी त्याला चौफेर घेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीच्या करंगळी आणि अनामिकेच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून एक बोट मोडले आहे. सदर व्यक्ती ही घरची कर्ती व्यक्ती असून पोलिसांनी एक हात निकामी केल्यामुळे आता घरातील दैनंदिन कामे कशी करायची? असा प्रश्न बिचाऱ्याला पडला आहे.

 belgaum
Police lathi
Police lathi during lock down

असाच प्रकार शुक्रवारी एका वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला. सदर वैद्यकीय कर्मचारी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे गळ्यात आपले ओळखपत्र घालून कामावर निघाला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला रस्त्यात अडविले. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने आपले ओळखपत्र दाखवून परिचय देण्याचा प्रयत्न केला. तथापि त्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी त्याला हातातील लाठ्या काठ्यांनी मारझोड केली. परिणामी बिचार्‍याला पाठीवर व हातापायावर लाठ्याकाठ्यांचे वळ घेऊन घरी परतावे लागले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये हे योग्यच आहे. तथापि जीवनावश्यक वस्तू अथवा अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्यास मुभा दिली असताना पोलिसांकडून या पद्धतीने अमानुष वर्तन केले जात असल्यामुळे तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि पोलिस आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली समज देण्याची जोरदार मागणी होत आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Police atirek karat ahet, especially in karnataka.. Look at other states like kerala police,they never use sticks at all.. Here police are misusing power, they are just behaving inhumanly, they should stop this barbaric behavior towards poor and needy people, they can handle it without beating in such harmful manner.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.