कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने बेळगावचे चिंच मार्केट आज सोमवार 23 मार्चपासून येत्या मंगळवार दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
दि बेळगाव चिंच व्यापारी असोसिएशन बेळगावच्या आज सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयानुसार आता बेळगाव चिंच मार्केट 23 ते 31 मार्च 2020 या कालावधीत बंद राहणार आहे यादरम्यान चिंचेचा कोणताही व्यापार अथवा आवक-जावक होणार नाही.
त्याचप्रमाणे अन्य ठिकाणी चिंचेचा व्यापार करण्यावर बंदी असणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.बेळगाव च्या आसपासच्या 200 की मी अंतरावरील शेतकरी चिंच विक्रीसाठी इथं येत असतात आणि या मार्केट मधील चिंच देशभरात जात असते.
सदर बैठकीस दि बेळगाव चिंच व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.