परदेशातून आलेल्या व्यक्तीला होम क्वारटाईन केलेले असताना घराबाहेर कुत्र्याला फिरवायला नेल्याची घटना माळमारुती परिसरात घडली आहे.श्रीनगर येथील एका घरातील व्यक्तीला परदेशातून आल्यामुळे आपल्या खोलीतच राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
पण ही सूचना धुडकावून परदेशातून आलेला हा महाभाग कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी घराबाहेर पडला.ही घटना आजूबाजूच्या लोकांना समजताच त्यांनी ही माहिती माळमारुती पोलिसांना दिली.
माळमारुती पोलीस स्थानकाचे अधिकारी गड्डेकर यांनी श्रीनगर येथे जावून परदेशातून आलेल्या त्या व्यक्तीला जाब विचारून धारेवर धरले.यापुढे घरातून नव्हे तर तुझ्या खोलीतून जरी बाहेर आलास तर क्रिमिनल केस दाखल करू असा सज्जड दम त्या परदेशातून आलेल्या व्यक्तीला देण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यात आज पर्यंत 369 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तसेच 248 जणांचे विलगीकरण (होम कोरोंटाइन)करण्यात आले आहे. ज्या नागरिकांचे विलगीकरण झालेले आहे. तसेच उपचारा अंती जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांनीदेखील बेसावध न राहता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
होम कोरोंटाइनचा संपर्क टाळा बेळगाव कोरोनामुक्त करा