शहापूर परिसरातील शिवारामध्ये जुगाराचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून तातडीने जुगारावर धाड टाकून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहापुर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वडगाव खासबाग व इतर भागात मोठ्या प्रमाणात मटका व जुगाऱ्यानी आपला डाव मांडला आहे. शहापूर परिसरातील शिवारामध्ये हे जुगारी दररोज ठाण मांडून बसत आहेत. काही जुगारी तर मद्य पिऊन तेथेच बाटल्या टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात जुगारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.याबाबत शेतकरी संघटनेने देखील अनेकदा नाराजी व्यक्त केली होती मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे.
जुगार खेळताना पैसे देण्या घेण्या वरून काही किरकोळ कारणावरून हाणामारीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शहापूर शिवाय परिसरात शेतकर्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असला तरी पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
ठिकठिकाणी मटका जुगाराचे डाव मांडून शेतीचे नुकसान करण्यातच धन्यता मानली आहे. जुगारी आणि पोलिसांची काही मिलीभगत तर नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी पोलिस प्रशासनाने या जुगारावर धाड टाकून कारवाई करणे गरजेचे आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.