कोरोना विषाणू प्रादुर्भाव आला रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉक डाऊनच्या काळात रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि गोरगरीब गरजुंसाठी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे ध्यानात घेऊन या लोकांना खादीमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे मोफत “रेशन किट”चे वाटप केले जाणार आहे.
खादीमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावचे कामिल बेपारी यांनी ही माहिती बेळगाव लाईव्हला दिली. लॉक डाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे विशेषता रोजंदारीवरील कामगार तसेच गोरगरीब जनतेचे अन्न पाण्याविना हाल होत आहेत. यासाठी खादीमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या मोफत रेशन किटचे वाटप केले जाणार आहे
सदर रेशन किटमध्ये 5 किलो तांदूळ खाद्यतेल 1 पाकीट, तूरडाळ 1 किलो, मसूरडाळ 500 ग्रॅम, मिरची पावडर 200 ग्रॅम, हळद शंभर ग्रॅम, मीठ 1 किलो आणि साखर 1 किलो या वस्तूंचा समावेश असणार आहे. सध्या हे रेशन किट बनविण्याचे काम सुरू असल्याचे कामिल बेपारी यांनी सांगितले.
कॅम्प पोलिस स्थानकाचे सीबीआय संतोषकुमार यांनी त्यांच्या परिचयातील गरजू व्यक्तींसाठी आमच्याकडून 5 रेशन किट घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात आम्ही 100 कुटुंबांना या रेशन किटचे मोफत वितरण करणार आहोत. सध्या बऱ्याच संघ – संस्था रोजंदारी कामगारांसह गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत हे लक्षात घेऊन ज्यांना अद्यापही मदतीच्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तू मिळालेल्या नाहीत. ज्यांना खरोखर जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे अशा लोकांची यादी तयार करून त्यांनाच या 100 रेशन किटचे मोफत वितरण केले जाणार असल्याचेही कामिल बेपारी यांनी स्पष्ट केले.
या संस्थेला मदत करायची असल्यास 9743089994 या क्रमांकावर फोन पे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.