जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि धान्य विक्रीसाठी बेळगावला एपीएमसी मध्ये आणू नये.शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील भाजीपाला आणि धान्य आपल्या तालुक्यातील एपीएमसी मध्ये विक्री करावी असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.एस. बी.बोमनहळ्ळी यांनी बजावला आहे.
शुक्रवारी सकाळी अनेक गावातून शेतकरी भाजीपाला घेऊन बेळगाव एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात घेऊन आले.त्यामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील एपीएमसी मध्ये भाजी ,धान्य विक्री करावी.तेथे भाजी,धान्य विक्री करताना नियमाचे पालन करावे सोशल डिस्टन्स पाळून शेतकऱ्यांनी विक्री करावी असे बोमनहळळी सांगितले.
व्यापाऱ्यांनी देखील त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे .नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.शुक्रवारी सकाळी भाजी विक्री खरेदी करण्यासाठी हजारो जण आले होते त्यामुळं मनपा पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिथं धाव घेत शेतकरी व्यापाऱ्यांना सूचना केल्या.