कोरोना विषाणुच्या धास्तीने प्रवाशांची संख्या घटल्यामुळे नैऋत्य रेल्वेने बेळगाव रेल्वे स्थानकामार्गे जाणाऱ्या 4 रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत.
मिरज – हुबळी एक्सप्रेस (क्र. 11047) आणि हुबळी – मिरज रेल्वे (क्र. 11048) या रेल्वेगाड्या येत्या गुरुवार दि. 20 पासून मंगळवार दि. 31 मार्च 2020 पर्यंत तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्याप्रमाणे कोल्हापूर – मंगळूर एक्सप्रेस (क्र. 11304) रेल्वे देखील 31 मार्च 2020 पर्यंत तसेच मंगळूर – कोल्हापूर रेल्वे (क्र. 11303) येत्या शनिवार दि. 21 पासून बुधवार दि. 1 एप्रिल 2020 पर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत घटलेली प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.