करण बिर्जे यांना क्राऊझ म्हणून ओळखले जाते. हे बेळगावमधील प्रसिद्धीच्या झोतात न आलेले रॅपर आहेत. महाद्वार रोड बेळगाव येथे राहणाऱ्या या गायका कडे अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त आहे
इंजिनियरिंगची पदवी संपादन केलेला करण बिर्जे उर्फ क्राऊझ हा तरुण रॅप संगीताच्या विश्वात आपले वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.मूळचा महाद्वार रोड बेळगावचा असलेला करण याला पूर्वीपासून गाण्याची आणि कविता करण्याचा छंद जडला आहे.पण त्याला कॉलेजमध्ये देखील आपल्या रॅपचा आविष्कार दाखवण्याची संधी मिळाली नाही.
शिक्षण पूर्ण झाल्यावर तो पुण्याला गेला.तेथे नोकरी करताना त्याला नानावाडी येथे संगीत अकादमी आहे असे मित्राकडून कळले.पुण्याहून परत बेळगावला आल्यावर त्याने ती अकादमी जॉईन केली.आजवर त्याने आठ गाणी स्वतः गायली आहेत.रॅपच्या क्षेत्रात नाव कमविण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे.आज मला विशेष कोण ओळखत नाहीत पण लवकरच माझी गाणी लोकप्रिय होतील असा विश्वास करण याला वाटतो.
हिप-हॉपबद्दल उत्साही
रॅपिंगचा आग्रह धरणे मला जागृत ठेवत आहे आणि स्क्रिप्ट करण्याची एकप्रकारची भूक लागली आहे असे करण सांगतात. सोशल माध्यमातून सामायिक करून त्याने आपले काम सुरू ठेवले आहे.
शब्द म्हणून प्रवाह आणि संगीत नेहमीच माझ्या डोक्यात होते आणि दुसरीकडे मी थोडासा अस्वस्थ होतो.माझ्या लहान वयातील कवीने मला रॅपिंगवर लक्ष केंद्रित केले. मी रॅप पासून खूप प्रेरित आहे, त्याचे प्रत्येक गाणे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे असेही तो म्हणाला. तेथे आपण याबद्दल उत्साही असल्यास आणि आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकतो असे आपल्याला वाटत असल्यास उभे रहा; त्यावर काम करा. आपण तरीही मरणार आहात मग बदल घडवून आणणारे असे काहीतरी करत का मरणार नाही असा प्रश्न करण ला पडतो. सध्या कामाच्या गडबडीत ये जा करताना तो आपला छंद जपत आहे.
के एल ई इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये असताना करण याने वेस्ट मटेरियल मधून रोबो कार ट्रान्सफॉर्मर बनवला होता त्याची चर्चा खूप झाली होती त्यामुळे लहान पणी पासून काही तरी नवीन करून दाखवायची जिद्द त्याच्यात आहे.सध्या तो एकस मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर आहे आपली नोकरी संपल्यावर मिळालेल्या वेळेत तो रॅप गाणी बनवत असतो.
सध्या करण या प्लॅटफॉर्म वर आहे
YouTube: Kraooze संगीत
https://m.youtube.com/channel/UCeET_hqZUgyVQ7-aSyKnDYg/featured
साउंडक्लॉड: क्रॉझ
इंस्टाग्राम: क्राऊझ
https://www.instagram.com/kraooze/?hl=en