सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका डॉ.सोनाली सरनोबत यांची कर्नाटक ऍनिमल वेलफेअर बोर्डच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पशू संगोपन खात्याचे मंत्री प्रभू चौहान यांनी या बोर्डची सुरुवात केली असून सामाजिक कार्यकर्ते,गोशाळेचे संचालक,प्राणी दया संघटनेचे कार्यकर्ते आणि काही आमदारांचीही या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगावातून नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत आणि पर्यावरण अभियंता शिवानंद डंबळ यांची या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली आहे.गोहत्येवर लक्ष ठेवणे,भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ उभारणे,जनतेला त्रासदायक ठरत असलेल्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यवाही करणे,जनावरांना त्रास दिल्या जाणाऱ्यावर कारवाई करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या साहाय्याने अन्य उपाययोजना करणे आदी जबाबदारी कर्नाटक ऍनिमल वेलफेअर बोर्डच्या सदस्यांची असणार आहे.