कर्नाटकातील बेलगावसह नऊ जिल्ह्यात उद्यापासून 31 मार्च पर्यंत लॉक डाऊनची घोषणा सरकारने केली आहे.बंगलोर,बंगलोर ग्रामीण,चिक्कबल्लापूर,कलबुर्गी,दक्षिण कन्नड,मंगलोर,धारवाड,म्हैसूर आदी जिल्ह्या बरोबर बेळगाव जिल्ह्यातही लॉक डाऊनची घोषणा केली आहे.आजपर्यंत बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही .मग बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन कशासाठी
अशी चर्चा सुरू आहे.लॉक डाऊन केलेल्या जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.मोठ्या कारखान्यात कामगारांची संख्या पन्नास टक्के इतकीच ठेवून त्यांच्याकडून काम करवून घ्यावे.परराज्यातून येणारे सारे मार्ग बंद राहणार असून अवश्यकतेशीवाय घराबाहेर पडू नये.अत्यावश्यक सेवा या कालावधीत सुरू राहणार आहेत.सोमवारी बस सेवा सुरू राहणार असून पुढील निर्णय नंतर घेतला जाणार आहे.सोमवारी बारावीचा शेवटचा पेपर आहे.त्यानंतर बससेवा आणि अन्य बाबींचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सकाळी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बैठक घेत दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती 31 मार्च पर्यंत सर्व शाळा कॉलेजना शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी घरात राहून आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वैद्यकीय तपासणी
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे. हा संसर्ग बेळगावातही होऊ शकतो यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्राला जोडणाऱ्या 15 रस्त्यांवर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आली आहेत.
शनिवारी बेळगाव दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामलू यांनी ही माहिती दिली होती. बेळगाव जिल्ह्यात अद्यापर्यंत कोरोना विषाणू बाधित एकही संशयित आढळलेला नाही. तथापि महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बेळगावच्या सीमा महाराष्ट्राला जोडले गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवरून बेळगावला सुमारे 15 रस्ते येतात. या रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बेळगावातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यातील संबंधित 15 रस्त्यांवर वैद्यकीय पथक तैनात केले जाणार असून या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होत आहे त्यामुळेच बेळगाव जिल्हा देखील लॉक डाउन झाला आहे.