मद्य दुकाने रात्री आज दहापासून एक एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्यामुळे सरकारी वाइन शॉपमध्ये स्टॉक खरेदी करण्यासाठी तळीरामांची झुंबड उडाली आहे तर वडगावमध्ये भाजी विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा भाव लावून जनतेची लूट चालवली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून मद्य दुकाने आज रात्रीपासून एक एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
त्यामुळे तळीरामानी वडगाव येथील सरकारी एम आर पी वाइन शॉप समोर रांगा लावल्या आहेत.मद्याच्या वाढत्या मागणीमुळे वाइन शॉप मधील शोकेस रिकाम्या झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.तळीरामानी स्टॉक गोळा करण्यासाठी बँकेत रांग लावतात त्याप्रमाणे वाइन शॉप समोर रांगा लागल्या आहेत.
वडगावमध्ये भाजी विक्रेत्यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा दराने भाजीची विक्री केली.
कोरोना आजाराच्या दक्षतेसाठी सरकार कडून लॉकडाउन करून 144 लावुन संचार बंदी केल्या मूळे जनतेकडून जीवनाआवश्यक वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जात आहे त्याचाच फायदा भाजी विक्रेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे भाजीचे दर आव्वा च्या सव्वा आकारण्यात येत आहे टोमॅटो 50 रु किलो,कोबी 40 रु,पालक 30रु दोन पेंढ्या,भेंडी 80रु किलो आशा प्रकारे दर आकारले जात आहेत तेंव्हा प्रशासनाने याची दखल घेऊन भाजी च्या किमती वर बंधने घालावी अशी जनतेची मागणी होत आहे