Monday, January 27, 2025

/

सर्वजण घरात असताना तो करत होता समाजकार्य

 belgaum

देशभरातील जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी कॉलेज रोड हॉस्पिटलमधील तातडीने रक्ताची गरज असलेल्या अरविंद आर. कुडूकर या रुग्णाला बीम्स ब्लड बँकेकडून तात्काळ एक युनिट एबी पॉझिटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजसेवक व फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी धन्यवाद दिले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, अरविंद कडुकर हा रुग्ण कॉलेज रोड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून आज रविवारी त्याला एबी पॉझिटिव्ह रक्ताची सक्त गरज होती. तथापि आजच्या जनता कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने रक्त कुठून मिळवायचे? हा प्रश्न अरविंद याच्या नातलगांना पडला होता.

Santosh darekar
Santosh darekar

याबाबतची माहिती मिळताच समाजसेवक संतोष दरेकर यांनी तात्काळ कॉलेज रोड हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच बीम्स ब्लड बँकेशी संपर्क साधला. तेंव्हा ब्लड बँकेचे लॅब टेक्निशियन बसवंताप्पा एम. यांनी दरेकर यांना एक युनिट एबी पॉझिटिव्ह गटाचे रक्त तात्काळ उपलब्ध करून दिले.

 belgaum

देशभरातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घोषित केलेल्या देशव्यापी जनता कर्फ्यूमुळे शहरातील सर्व व्यवहार बंद असतानाही संतोष दरेकर यांनी धावपळ करून वेळेवर रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.