आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी बेळगाव विमानतळावर आवश्यक सुविधा आहेत मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध आहे गरज लागल्यास अत्यल्प जमिनीची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे सांबरा विमान तळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यास काहीच अडचण येणार नाही असे मत एअर पोर्ट डायरेक्ट राजेश कुमार मौर्य यांनी खास बेळगाव live शी बोलताना दिली.
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून सध्या दर महिन्याला 37 हजारहून अधिक प्रवाशी हवाई प्रवास करत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या बेळगांव एअरपोर्ट अथॉरिटीच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब असून सध्या 9 शहरांशी जोडल्या गेलेल्या बेळगावच्या सांबरा विमानतळांशी आता आणखी 4 – 5 शहरांना संलग्न केले जाणार आहे असे ते म्हणाले.
विमानतळावरून मध्यंतरी विमानांचे उड्डाण थांबले होते. परंतु बेळगाव एअरपोर्ट ऑथोरिटीसह स्थानिक लोकप्रतिनिधी, उद्योजक, चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई सिटीजन कौन्सिल आदी विविध संघटना आणि नागरिकांच्या सातत्याच्या प्रयत्नानंतर या विमानतळाला अच्छे दिन आले आहेत. सध्या बेळगाव विमानतळावरून चौदा विमानांचे दररोज 27 ते 28 वेळा उड्डान व आगमन होत असते. गेल्या 13 जून 2018 मध्ये बेळगाव विमानतळावरून स्पाइस जेटची मुंबई, हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई या चार शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध होती. परंतु उडान – 2 मध्ये हुबळीचा समावेश झाल्यामुळे बेळगावच्या स्पाइस जेट विमानसेवा हुबळीला हलविण्यात आली. परिणामी मध्यंतरी बेंगलोर व्यतिरिक्त सांबरा विमानतळावरून कोणतेच विमानाचे उड्डाण होत नव्हते.
गेल्या 2017 आणि 2018 साली बेळगाव विमानतळ कस्टमर सटिस्फॅक्शन इंडेक्स म्हणजेच “ग्राहक समाधान वर्गवारी”मध्ये अनुक्रमे 19 व्या व 16 व्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या उडान – 3 योजनेमध्ये बेळगावचा समावेश व्हावा यासाठी बेळगाव एअरपोर्ट ऑथोरिटीने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले. त्याला लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचेही उत्तम सहकार्य लाभले. या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे सवलत, विविध विमान कंपन्यांचे सहकार्य आणि प्रवाशांचा वाढत्या प्रतिसादामुळे मिडीयम साईज एअरपोर्टच्या कस्टमर सटिस्फॅक्शन इंडेक्स म्हणजेच “ग्राहक समाधान वर्गवारी”मध्ये (सीएसआय) बेळगाव विमानतळाचा सध्या देशात 12 वा क्रमांक आहे, असे ते म्हणाले.
बेळगाव विमानतळावर असणाऱ्या सोयीसुविधाबाबत बोलताना राजेशकुमार मौर्य म्हणाले, दिव्यांगांसाठी येथे विशेष सुविधा असून अलीकडेच प्लास्टिक बॉटल क्रशर तीन ठिकाणी बसवण्यात आले आहेत. एटीएम आणि कॅन्टीनची सुविधा तर आहेच. आता प्रवाशांची संख्या वाढल्याने विमानतळाच्या लॉबीमध्ये आसनांची कमतरता भासत आहे त्यामुळे लवकरच 300 खुर्च्याही बसवत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या बेळगाव विमानतळावरून 9 शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता येत्या मे महिन्यामध्ये सुरत, जयपूर, जोधपूर अशा आणखी चार-पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. लोकांनी अधिक हवाई प्रवास केला, ग्रामीण भागातील युवा व्यवसायिकांनी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने विमान प्रवासाचा विचार केला तर प्रवाशांची संख्या निश्चितच वाढेल, ज्यामुळे बेळगाव विमानतळाचा सीएसआय वाढण्यास मदत होईल, असा आशावाद मौर्य यांनी व्यक्त केला.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळावर दोन शिफ्टमध्ये एक डॉक्टर आणि एक नर्स तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांचे थर्मल स्कॅनींग केले जात आहे आणि हेल्थ टेस्टरही बसवण्यात आला आहे, असे बेळगावच्या सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी नमूद केले.
दीड वर्षापूर्वी झिरो विमान टेक ऑफ ते आज दररोज 14 विमानांची झेप बेळगावच्या सांबरा विमान तळाचा कसा आहे प्रवास? ग्राहक समाधान क्रमवारीत अव्वल आलेल्या सांबरा एअर पोर्टमध्ये कश्या आहेत सुविधां? काय विमान तळाच्या सुधारणेत मोलाची भूमिका बजावलेले एअर पोर्ट डायरेक्ट राजेश कुमार मौर्य काय म्हणतात?पहा त्यांच्या exclusive इंटरव्यू फक्त बेळगाव Live खालील लिंकवर
#belgaumairportdirector
#apdrajeshkumarmourya
#airportauthorityindia
#belgaumLivenews
#sambraairport
दीड वर्षापूर्वी झिरो विमान टेक ऑफ ते आज दररोज 14 विमानांची झेप बेळगावच्या सांबरा विमान तळाचा कसा आहे प्रवास? ग्राहक…
Posted by Belgaum Live on Tuesday, March 17, 2020