मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे नाराज झालेल्या आमदार उमेश कत्ती यांनी सरकारविषयी वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री येडीयुरप्पा देखील नाराज आहेत.आता हाय कमांडने उमेश कत्ती यांना बजेट अधिवेशन पूर्ण होईपर्यंत गप्प राहण्याचा संदेश पाठवला आहे.
पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी हा संदेश कत्ती यांना पाठवला आहे.अर्थसंकल्प अधिवेशन झाल्यावर तुम्हाला निश्चित मंत्रीपद मिळेल असे आश्वासनही नड्डा यांनी कत्ती यांना दिले आहे.सरकार स्थापन झाल्यावर देखील कत्तीना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती.
नंतर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जाईल असेही सांगण्यात आले होते.पण मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर देखील कत्ती यांना मंत्रीपद मिळाले नाही.
त्यामुळे कत्ती बंधूनी दिल्ली दरबारी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती.आता अर्थसंकल्प अधिवेशन होईपर्यंत कत्ती यांना मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.