Monday, May 6, 2024

/

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाची आगळी कारवाई

 belgaum

शहरवासियांच्या सोयीसाठी दुचाकी वाहने भाडेतत्त्वावर देण्याची योजना राबवणाऱ्या बाऊन्स कंपनीची फुटपाथ आणि नो पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले तब्बल 310 वाहने जप्त करण्याची आगळी कारवाई मंगळवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. जप्त केलेली वाहने डी सी ऑफिस मध्ये आणून ठेवली आहेत.

शहरवासियांसाठी ऑनलाइनद्वारे भाडे भरून कोणत्याही स्थळी दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्याची योजना बाउन्स कंपनीतर्फे राबवण्यात येत आहे. मात्र शहरात विविध ठिकाणी ही वाहने उपलब्ध करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. रस्त्याशेजारी फुटपाथ आणि नो पार्किंगच्या ठिकाणी ही वाहने उभी करण्यात येत होती. याखेरीज वाहनांवर कंपनीचे नांव लिहून जाहिरात करण्यात येत असून यासाठी देखील महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे समजते.

शहरातील रस्त्यांवर ठिकाणी तसेच फुटपाथ आणि नो पार्किंगच्या ठिकाणी उभी केली जाणारी भाडेतत्वावरील ही वाहने अडचणीची ठरत होती. याठिकाणी वाहने उभी करण्यात येऊ नयेत अशी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काल मंगळवारी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणारी बाउन्स कंपनीची संबंधित सर्व 310 वाहने जप्त करण्याची कारवाई केली. त्याचप्रमाणे विनापरवाना जाहिरात किंवा विनापरवाना रस्त्यावर वाहने पार केल्याप्रकरणी यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 belgaum

सर्वसामान्यत: अशा पद्धतीने वाहने जप्त करण्याची कारवाई फक्त रहदारी पोलिसांकडून कारवाई केली जाते. रहदारीच्या ठिकाणी तसेच नो पार्किंगच्या जागेत कशाही पद्धतीने नियम धाब्यावर बसवून वाहने पार्क केली जातात. याचा ये -जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. बऱ्याचदा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचीही कोंडी होते. आतापर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून बेकायदेशीर बांधकामे, दुकाने वगैरे हटविण्याची मोहीम राबवली जात होती. मात्र आता पोलिसांच्या बरोबरीने बेळगाव महानगरपालिकेने देखील उपरोक्त पद्धतीने वाहन जप्तीची कारवाई केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.