संगमेश्वरनगर, बेळगाव येथील सरकारी विद्यार्थी वस्तीगृहात सशस्त्र धुडगुस घातल्या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी 6 तरुणांना अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुलं आहेत एकूण 8 जणांना अटक झाली आहे.
मदन उर्फ मोहित महेंद्र हुंदरे (वय 27), अंकुश अरुण हुंदरे (वय 19), प्रसाद सुरेश जांबळे (वय 20), प्रथमेश रमेश वरपे (वय 21, सर्व रा. गणेश चौक सदाशिव नगर) आणि अजय युवराज पवार (वय 22, रा. बेलदार छावणी सदाशिवनगर) योगेश बळवंत तरळे वय 20 रा.सदाशिवनगर बेळगावअशी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. संगमेश्वरनगर येथील सरकारी विद्यार्थी वसतिगृहात गेल्या रविवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास 15 – 20 जणांच्या सशस्त्र टोळक्याने दगडफेक करून धुडगुस घातला होता. बॅट, स्टंप, लोखंडी रॉड आदी घेऊन हॉस्टेलमध्ये घुसलेल्या या टोळक्याने त्याठिकाणी बरीच तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त लोकेश कुमार एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी आदी पोलीस अधिकाऱ्यांसह समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. रविवारी झालेल्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणातून ही घटना घडल्याचे त्यावेळी सूत्रांकडून सांगण्यात आले. विद्यार्थी वस्तीगृह आवारात घुसून टोळक्याने केलेली दगडफेक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी धरणे धरले होते.
याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी सखोल चौकशी आणि तपासाअंती मदन, अंकुश, प्रसाद, प्रथमेश व अजय या 5 जणांना अटक केली आहे. पोलिस चौकशीत या चौघांकडून वस्तीगृहात कशासाठी धुडगूस करण्यात आला याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. उपरोक्त घटनेची एपीएमसी पोलीस स्थानकात नोंद झाली असून याप्रकरणी अद्याप अधिक तपास सुरू आहे.