कर्नाटक आणि गोवा संचलनालयामध्ये उत्कृष्ट एनसीसी छात्र म्हणून प्रथम क्रमांक व अखिल भारतीयस्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल बेळगावच्या विराज मनोज कुलकर्णी या विद्यार्थ्याला नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन समारंभात कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
बेळगाव येथील सेंट पाॅल हायस्कूलचा विद्यार्थी आणि 8 कर्नाटका एअर स्काॅड्रनचा एनसीसी छात्र विराज मनोज कुलकर्णी याची कर्नाटक आणि गोवा संचालनालयातर्फे “उत्कृष्ट एनसीसी छात्र” म्हणून निवड झाल्यामुळे त्याला नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. सदर पथसंचलनात विराजने बेळगावच्या 8 कर्नाटका एअर स्काॅड्रनसह कर्नाटक व गोवा संचालनालयाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी बजावली. परिणामी त्याला कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
गोवा व कर्नाटक विभागात झालेल्या स्पर्धांमध्ये विराजने समूह गायन समूह नृत्य व लेखी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. कॅम्प येथील सेंट पॉल हायस्कूलचा विद्यार्थी असणारा विराज कुलकर्णी हा शाळेचा ‘स्कूल प्युपील लीडर’ देखील आहे शेरी गल्ली बेळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक ज्योती व मनोज कुलकर्णी यांचा तो चिरंजीव असून एअरफॉर्स आणि युनियन बँकेचे निवृत्त कर्मचारी अप्पाजी कुलकर्णी व पुष्पा कुलकर्णी यांचा नातू आहे. त्याला विंग कमांडर पी. आर पोंनाप्पा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल विराज कुलकर्णी याचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.