Saturday, December 28, 2024

/

एपीएमसीच्या अंतर्गत रस्त्यांची वाताहात

 belgaum

जिल्ह्यात बटाटा कांदा रताळी व इतर साहित्याने आर्यात निर्यात करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती एक महत्वाना दुवा आहे . मात्र या एपीएमसीमधील रस्त्यामध्ये खड्डे पसरले आहे . त्यामुळे येथे ये-जा करताना नागरिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खड्यांतून प्रवास नारावा लागतो. यामुळे अधिकतर व्यापारी येथे येताना अधिक सावधता बागत असल्याचे दिसून यते आहे. वारंवार तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, त्यामुळे याला वाली कोण असा प्रश्न उपस्थित हाते आहे.

दरम्यान अंतर्गत रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कामाला केव्हा चालना मिळणार? असा सवाल उपस्थित नेला जात आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपले व्हीजन अनेकांना सांगून एपीएमसीचा कायापालट करण्याने आश्वासन देतात. मात्र आश्वासनाखेरीज कोणतन काम होत नसल्याने दिसून येत आहे.

या रस्त्यांवरील खाकड्यावरही नागरिकांनी वृक्षारोपण करण्याची वेळ आली आहे. असे दिसून येत आहे . खड्डे वारवार मुजविण्यासाठी डाबरीकरण करण्यात आले. तरी देखील या रस्त्यावर खड्डे पडतात. मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम खाते आणि एपीएमसीच्या माध्यमातून येथे डांबरीकरण करण्यासाठी कोणतेन पाऊल उनलण्यात जाले नाही. त्यामुळे यापुढे तरी याकडे लक्ष देण्यात यावे व तातडीने रस्ते कामाला सुरवात करावी, अशी मागणी होत आहे.

अंतर्गत रस्त्यासाठी मोठया प्रमाणात कामाना चालना देण्याची गरज नाहे. महत्वाचे म्हणजे अधिक वजनाची वाहतूक या रस्त्यावर होत असते. त्यामुळे रस्ते करताना ते मजबूत आणि न खचणारे कराने गरजेचे आहे. रस्ते केले आणि महिन्यातच त्यांची दुर्दशा झाली तर काय उपयोगा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे व्यवस्थीत करावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.